कृपया आमच्या कार्याबाबत अधिक माहिती वाचा.
१) अनाथालय (बालकाश्रम ) :-
सामाजिक बांधलकी जोपासत समाजासाठी समाजकार्याचा वसा संस्थेने चालविला त्यातून आजच्या समाज रचनेत अनाथ निराधार बालके , आईवडील विना पोरकी बालके झालेली या बालकांच्या भविष्यातील अंधकार दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करित आहोत. त्या बालकांना निव्वळ आसरा देत नाही तर ,अन्न वस्त्र ,निवारा आरोग्य शिक्षण संस्कार व पुर्नवसन या सर्व गरजांची पुर्ती करून त्यांच्या आयुष्याला अर्थ व सौंदर्य प्राप्त करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करित आहोत या बालकांना बाल न्याय मंडळाच्या मान्यतेने प्रवेश दिला जातो. त्यांना शैक्षणीक सुविधा यात त्यांच्या उत्तीर्ण वर्गानुसार शाळेत प्रवेश मिळवून दिला जातो. शालेय साहित्य उदा .स्कुल बॅग, वह्या पुस्तके ,पेन ,पाटी, पेन्सील कंपासपेटी इ.सर्व साहित्य संस्थेतर्फे पुरविण्यात येते. याच बरोबर शालेय गणवेश व दोन रंगीत ड्रेस तसेच अंडरवियर बनियान चप्पल, बुट, इ .साहित्य दिले जाते.
भोजनामाध्ये सकाळी दूध नाश्ता, दूपारच्या जेवणात वरणभात भाजी पोळी व संध्याकाळचे जेवण दिले जाते. यात विशिष्ट सणाना व महिन्यातुन तीन वेळा गोड जेवण दिले जाते. मुलांना राहण्यासाठी १८० ते २०० स्के. फु. च्या ४२ खोल्याची सुंदर वस्तू बांधण्यात आलेली आहे. यात प्रत्येक खोली मध्ये प्रत्येक मुलास एक लॉकर एक गादी बेडशिट टॉवेल आंघोळीसाठी साबण इ.संस्थेमार्फत देण्यात येते. त्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी R.O.वॉटर फिल्टर सिस्टीम लावण्यात आलेली आहे. तसेच थंड पाण्यासाठी वॉटर कुलर देखिल आहे. आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. या मुलांच्या मनोरंजनासाठी ग्रंथालय ,टी.व्ही. सी.डी.तसेच क्रिकेट साहित्य, कॅरम बुद्धीबळ ,खो-खो असे विविध खेळ घेतले जातात आरोग्या बाबत विशेष लाभ पुरविले जाते.यासाठी मुलांना योगासने करणे तसेच त्यांची मेडीकल चेकिंग करणे या खेरीज त्यांना सकस पोषक आहार दिला जातो. या बालकांची दिनचर्या ठरलेली असते ५.०० वाजता सकाळी उठणे त्यानंतर आंघोळ व्यायाम व प्रार्थना ७.३० वा. नाश्ता, ८ते १० वा. अभ्यास व खेळ, १० ते ११ जेवण, ११ ते ११.३० शाळेची तयारी १२.०० ते १७.३० शाळा, १७.३० ते १८.३० हातपाय धुणे, १८.३० ते १९ प्राथना, १९ ते २० संध्याकाळचे जेवण, २० ते २१.३० अभ्यास अशा प्रकारे बालकाश्रमाची दिनचर्या सुरु आहे. यात आज शासनाच्या मान्यते प्रमाणे १०० बालकांना प्रवेश देण्यात आलेला आहे. या योजनेला आता पर्यंत कोणत्याही स्वरूपाचे शासकीय अनुदान नाही.
२) वृध्दाश्रम :-
आधुनिक युगात जग हे जवळ येत आहे परंतु व्यक्ती -व्यक्तीमधील प्रेमाचे जिव्हाळा कमी होत आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा सर्वजण डोक्यावर मिरवित आहे. नविन पिढी व जुनी पिढी यातील अंतर दिवसंदिवस वाढत आहे.आयुष्याच्या सांयकाळी कुणाचा तरी आधार असावा या दृष्टीने विचार करून वृद्धाश्रमाची सुरवात करण्यात आली सदय स्थितीत वृध्दाश्रमात १२ वृद्ध आजी बाबा आहेत यांना संस्थे मार्फत प्रत्येकी खोली, पलंग, गादी, उशी, चादर ब्लँकेट याच बरोबर सकाळचा चहा नाश्ता २ वेळचे जेवण दुपारचा चहा दिले जातो तसेच वर्षातून दोन वेळा कपडे देखिल दिले जाते. तसेच यासाठी मासीक शुल्क दरमहा ८०० रू. आकारले जातात. परंतु १२ वृध्दा मधून ६ वृद्ध हे पैसे देवू शकतात तर ६ वृद्धांना मोफत हया सर्व सुविधा पुरविण्यात येतात. तसेच आरोग्या विषयी काळजी, आंघोळीला गरम पाणी अशा सुविधा पुरविल्या जातात.
३) गो-शाळा :-
समाजातील विविध पैलूवर लक्ष केंद्रित करतांना त्यांना असे निदर्शनास येवू लागले कि गो माता वृद्ध झाल्यामुळे, चाऱ्याची कमतरता झाल्यामुळे, जास्त पैसे मिळविण्याचा स्वार्थ विविध प्रकारचे आमीष याला बळी पडून गाई कत्तल खात्याकडे छुप्या मार्गाने जात आहेत. यासाठी सन २००६ मध्ये गो-शाळा स्थापन करावयाची व गायींना दत्तक घेवून त्यांचे संवर्धन करावे व गाईची होणारी हेळसांड व कत्तल थाबंवावी या सर्व बाबींचा विचार विनियम करून सन २००६ मध्ये गो-शाळा सुरू केली. अपंग गाई, वृद्ध गायी गंभीर गायी, आजारी गाई आश्या प्रकारची शेडची व्यवस्था करण्यात आलेली असून गायीच्या दुधाचा वापर अनाथालयातील बालकांना नाश्तासाठी केला जातो व गायींच्या शेणाचा वापर बायोगॅस निर्मिती करून १०० अनाथ बालके व २५ वृद्धाच्या स्वयंपाकासाठी होत आहे. संस्थेचा मानस आहे की सर्व गायींना संरक्षण व रक्षण करावयाचे त्यांच्या चाऱ्याची व्यवस्थेसाठी गो माता चारा दत्तक योजना हिंदू समाजात राबवून प्रत्येकी दिवसासाठी सकाळ व संध्याकाळच दोन्ही वेळचा चारा पुरविणाऱ्या दानशूर व्यक्तीचा शोध घ्यावयाचा. मलमुत्रापासून विविध उपयुक्त व आरोग्यास उपयुक्त वस्तु तयार करून समाजातील सर्व लोकांना गायीचे महत्व , उपयुक्तता समजावून हिंदू धर्म संस्कृतीचे रक्षण व जोपासना करण्यास लावणे. हा उदात्त हेतू डोळयापुढे ठेऊन गो शाळा चालवीली जात आहे.
गो-शाळा उद्देश :-
४) वस्त्र पेढी योजन :-
संस्थेद्वारा समाजातील दिन दुबळया लोकांना साठी हि योजना सुरु करण्यात आलेली आहे. उच्चभ्रु लोक आपले कपडे काही दिवस वापरून टाकुन देतात अशी वस्त्रे त्यांच्या स्वेच्छेने त्यांनी संस्थेत जमा केली की आम्ही त्यांना धुवून फाटलेली असल्यास शिवून प्रेस करून ज्यांच्या अंगावर आज पुरेशी वस्त्रे नाहीत व ते लोक नविन वस्त्रे मिळु शकत नाहीत अशा लोकांना व बालकांना वापरण्यास देतो. या वस्त्रपेढी योजनेचा लाभ चोपडा शहरातील गरिब गलिच्छ वस्तीमध्ये देण्यात येतो. अश्या प्रकारे वस्त्रपेढी योजना चालविण्यात येते.
भारतासारख्या देशात गरीबीचे प्रमाण जास्त आढळून येते आजही बरेचसे लोक अर्ध पोटी व अर्धवट कपडयांवर दिसून येतात तसेच आदिवासी भागात देखील लोक व लहान बालके उघडे नागडे राहातात. त्यांना जेम तेम रोजगार मिळतो परंतु त्यातले काही पैसे पुरुष वर्ग व्यसनाकडे खर्च करतात. पुरेसे अन्न नाही, वस्त्र नाही त्यामुळे मुले बाळे शिकत नाही म्हणून विचार करून आपण जे काही कपडे बाजूला सारतो त्यांचा वापर करत नाही असे कपडे उच्चभ्रू समाजाकडून मागावे व त्यांना धुवून जर ते शिवणकामा योग्य असतील
तर त्यांचे शिवणकाम करून त्यांना प्रेस करून ते कपडे ज्यांना त्याची आवश्यकता आहे त्या लोकांन पर्यंत पोहचविण्याचे कार्य अमर संस्थेच्या माध्यातून आजतागायत सुरु आहे तेथील बालकांना शिक्षित करण्याचे कार्य सुरु आहे.
५) पाळणाघर :-
समाजातील गोरगरीब मजदूर वर्ग पोटाला पोटभर भाकरी मिळावी याकरिता मोलमजूरीचे काम करीत आसतो. अश्या परिस्थितीत त्यांच्या बालकांच्या पालनपोषणा कडे दुर्लक्ष होत असून अश्या बालकांना पुरेसे पोषक वातावरण व आहार न मिळता ती बालके कुपोषित व भरपूर प्रमाणात दगावतात. मग अश्या बालकांसाठी आपणास काय करता येईल ? जेणे करून त्यांची मोल मजूरी हि होईल व बालकांचा साभांळ होईल यातूनच पाळणाघर हि संकल्पना उदयास आली. या योजनेची सुरुवात सन १९९९ मध्ये सुरु करण्यात येवून यामध्ये ० ते ६ वर्ष वयोगटातील मोल मजूरी,शेत मजूरी करणा-या स्त्रियांच्या बालकांना विनामुल्य प्रवेश देण्यात आला. सकाळी ७ वाजे पासून तर संध्याकाळी ५ वाजे पावेतो या बालकांना पाळणा घरात राहण्याची व्यवस्था करण्यात येवून या बालकांना पोषक व सकस आहार,झोपण्याची सुविधा, मेडिकल तपसणी, सुसज्य असे खेळणी घर, प्रशिक्षित आया यांच्या मदतीने त्यांचा साभांळ करण्यात येवू लागला व कुपोषणा पासून व बालमृत्यू पासून वाचविण्याचे कार्य आजतागायत सुरु आहे.
६) गलिच्छ वस्तीत बालसंस्कार केंद्र :-
लहान बालकांनवर लहान वयात संस्कार व चांगले विचारांची व शिक्षणाची आवड निर्माण करता येते. ही गोष्ट लक्षात घेऊन गलिच्छ वस्तीत बालवाडी सुरु करावयाचे त्यांना विनामुल्या प्रवेश देण्याचे काम सन १९९४ पासून अहोरात्र सुरु आहे. या बालसंस्कार केंद्रांमध्ये बालकांना गणिती शिक्षणाबरोबर संस्कारात्मक शिक्षण देखील दिले जाते उदा. शाररीक स्वच्छता, मोठयांशी बोलण्याची पद्धत, वाईट सवयीचे दुष्यपरीणाम अश्या स्वरूपाचे विनामुल्य प्रशिक्षण अश्या बालकांना देण्यात येते व त्यांना शाळेची आवड निर्माण करणे व सुंस्कारीत बालके घडविण्याचे कार्य संस्थेमार्फत आतजागायत सुरु आहे.
७) अत्याचारीत महिलासाठी संरक्षण केंद्र :-
कौटुबिंक हिसांचारापासून महिलांचे संरक्षण केंद्र :- महिलांवर अत्याचार करणाऱ्या अनेकअनिष्ट रुढी परंपरा जसे हुंडाबळी, बालविवाह इ. या समाजातील प्रथामुळे महिलांनाकौंटुबिक छळ, शाब्दीक छळ, लैंगिक छळ, मानसिक किंवा आर्थिक छळ हुंडा महिलांनाअपमानित करणे इतर बऱ्याच कारणाने महिलांवर अत्याचार केले जातात. म्हणून शासनानेकौंटुबिक हिसांचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ अस्तित्वात आणला या कायदयान्वयेमहिलांना संरक्षण मिळावे म्हणून महिला संरक्षण केंद्र संस्थेद्वारा सुरु करण्यात आले आहे. यात पिडीत महिलांना संस्थेद्वारा भोजननिवास इतर सर्व सुविधा मोफत पुरविलाजातात. व त्यांची संरक्षणाची जबाबदारी संस्थेद्वारा असते. यासाठी कोणत्याही स्वरूपाचे अनुदान मिळत नाही.
समाजात महिलांवर विविध प्रकारे अत्याचार होत असलेले दिसुन येते आहेत ग्रामीणभागात याचे पमाण जास्त दिसुन येत आहे. यासाठी शासनातर्फे सन २००५ च कायदा करण्यात आला व त्या कायदया अंतर्गत महिलांसाठी संरक्षण गृह विना अनुदान तत्वावरसुरु करणेसाठी स्वयंसेवी संस्थाची निवड करण्यात आली. त्यात संस्थेची निवडकरण्यात आलेली आहे या संरक्षण गृहव्दारे अत्याचारीत महिलांना निवास, भोजन, संरक्षण इ. सुवीधा पुरवीण्यात येतात.
८) श्री दत्त कॉम्प्युटर इन्स्टिटयुट संगणक प्रशिक्षण केंद्र :-
अमर संस्थेच्या ध्येय्याप्रमाणे सर्वसामान्यांची सेवा करणे हा हेतू समोर ठेऊन संगणक प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यात सर्व प्रकारचे सॉप्टवेअर व हार्डवेअर कोर्सेस शिकवीले जातात. यासाठी कमी फी आकारण्यात येते.
९) पुस्तक पेढी योजना :-
या योजनेद्वारे जे विदयार्थी शालेय शिक्षण घेत आहेत परंतु परिस्थीती अभावी शालेय पुस्तके घेवू शकत नाही त्या विद्यार्थ्यांना पुस्तक पेढी मार्फत वार्षिक ५ ते १० रू.फी घेवून वर्षभर पुस्तके वापरायला मिळतात या योजनेचा लाभ दलीत वस्ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन होत आहे.
१०) स्वयं रोजगार मागदर्शन शिबीर :-
अमर संस्थेने नेहरू युवा केंद्र जळगांव या युवकासाठी कार्य करण्याऱ्या भारत सरकारच्या उपक्रमाशी संलग्न होऊन युवकासाठी विविध शिबिरांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, श्रमदान शिबीराचे आयोजन संस्थेतर्फे केले जात आहे. या माध्यमातुन ग्रामीण भागातील युवकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत केला जात आहे.
१) सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय :-
जास्तीत जास्त बालके दुरदर्शन संचच्या ठिकाणी बसतात किंवा मोबाईल खेळ खेळतात त्यामुळे त्यांची वाचन क्षमता कमी होवून त्याकडे असणा-या शब्दांचा साठा कमी कमी होत चाललेला आहे. या सर्व गोष्टींचा निर्माण होणा-या जिवंत प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी इ.स.१९९४ मध्ये ग्रंथालयाची स्थापना केली या ग्रंथालयामध्ये १५५३० ग्रंथ असून त्यामध्ये बालकांना वाचण्यासाठी बाल ग्रंथालय, वाचण्याची आवड निर्माण करावी व त्याच बरोबर दैनदिन घडामोडी ही वाचण्यात याव्यात त्यामुळे वाचकांना आवड निर्माण होवून शब्दकोषांचा साठा वाढेल व जनरल नॉलेज सारखी पुस्तके म्हणजे नोकरी संदर्भातील मार्गदर्शन पुस्तके वाचनाची सवय लागेल अभ्यासात वाचन क्षमता वाढेल वाचन केल्यामुळे संभाषण कौशल्ये वाढून स्टेज डेअरिंग वाढेल निर्णय क्षमता वाढण्यास मदत होईल म्हणून मुलांना वाचण्याची व ग्रंथालयाची सुविधा आजतागायत सुरु असून चोपडयात "ब" दर्जाचे उत्तम अश्या सुविधा युक्त ग्रंथालय सुरु आहे.
२) कोचींग क्लॉसेस :-
आधुनिक काळात शालेय शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना जादा माहितीची गरज भासते त्यासाठी विद्यार्थ्याच्या संर्वागीण विकास व्हावा ज्या विद्यार्थ्याची आकलन क्षमता कमी आहे. त्यांना सर्व सामान्य विद्यार्थ्याच्या सोबत येता आले पाहिजे व जी सर्वसामान्य आहेत त्यांच्या अभ्यासात आणखी प्रगती होऊन त्यांची बौघ्दिक क्षमता वाढली पाहिजे यासाठी संस्थेने कोचींग क्लासेसची सुवीधा अल्पशी फी घेऊन सर्वांनसाठी उपलब्ध करून दिलेली आहे.
३) पु.सानेगुरुजी माध्यमिक विद्यालय वडती :-
अमर संस्था ह्या सर्वांगसुंदर संस्थेने अन्न, निवारा ह्या मुलभुत गरजांसोबतच व्यक्तीमत्व विकासासाठीची आणखी एक मुलभुत गरज म्हणजे शिक्षण हे तत्व उराशी बाळगून वडती या सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या आदर्श गांवात सन २००० पू. साने गुरुजी माध्यमिक विदयालयाची मुहूर्तमेढ रोवली या विदयालयात इ ५ वी ते १० वी चे बर्ग सुरळीतपणे सुरु आहेत. विदयार्थी हाच घटक डोळयासमोर ठेऊन विदयालयात क्रमिक अभ्यासक्रमासोबत मूल्यशिक्ष्ण, व्यक्तीमत्व विकास, आरोग्य शिक्षण , एम.सी.सी. पथक, करुणा क्लब, राष्ट्रिय हरीत सेना, विज्ञान मंडळ असे नवोपक्रम राबविण्यात येत आहेत.
४) बालमोहन प्राथमिक विदयालय :-
संस्थे मार्फत सन २००३ पासून प्राथमिक विद्यालय सुरु करण्यात आलेले आहे या विद्यालयची सुरुवात छोटयाश्या मातीच्या खोलीपासून होऊन आज शाळेची मोठी इमारत उभी आहे. या शाळेत इ. १ ली ते १० वी पर्यंतचे वर्ग चालवीले जात आहेत. यात मुलांना सर्व शैक्षणीक सुविधा पुरविल्या जातात यात संगणक प्रशिक्षण, ग्रंथालय, आधुनिक प्रयोग शाळा, सर्व प्रकारच्या खेळांचे साहित्य, तसेच यात सन २०११-१२ या शैक्षणीक वर्षात एकूण ९३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
५) लिटल हार्ट इग्लिंश मेडीयम स्कुल :-
संस्थेने काळाची गरज ओळखून मराठी माध्यमासोबतच इंग्रजी माध्यमाची शाळा सन २००४ पासून शासनाच्या मान्यतेने सुरु केलेली आहे. यात नर्सरी पासून ते इ.८ वी पर्यंतचे वर्ग चालविले जात आहेत प्रथम शाळेची सुरुवात चोपडा शहरात करण्यात आली परंतु कालांतराने विद्यार्थी संख्या व वाढते वर्ग लक्षात घेता जागा अपूर्ण पडू लागली म्हणून संस्थेने चोपडा शह्ररापासून ३ कि.मी. अंतरांवर निसर्गरम्य परिसरात वेले येथे नवीन शाळेची इमारत बांधली व सन २०१० पासून वेले येथे शाळा सुरु करण्यात आली यात मुलांना सर्व शैक्षणीक सुविधा पुरविल्या जातात यात संगणक प्रशिक्षण, हार्स रायडींग, कराटे, आधुनिक प्रयोग शाळा.
६) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अभ्यासक्रम :-
१० वी ची परिक्षा पास किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे काय करावे हा पश्न पडलेला असतो चोपडया सारख्या ग्रामिण भागातील मुले रिकामी फिरतात अश्या मुलांनमध्ये असलेल्या कला गुणांना वाव मिळावा व त्यांनी आपला स्वतःहाचा व्यवसाय सुरु करून आपल्या पायावर उभे रहावे या हेतूने अमर संस्थेने सन २००८-०९ या शैक्षणीक वर्षात शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमाची मान्यता घेण्यात आली यात बेंच फिटर, इलेट्रिक् असिस्टंट व वेल्डर कम फेब्रीकेटर या ३ विभागांना सुरुवात करण्यात आली या व्यवसाय प्रशिक्षणामुळे अनेक विदयार्थी आपापल्या भागात व्यवसाय करीत आहेत तर काही कंपनीमध्ये नोकरी करीत आहेत.
१) स्वर संगीत विदयालय :-
शाळेतील मुले, अनाथालयातील काही मुले व समाजातील काही मुले यांच्या सुप्त गुणांचा विकास साधण्यासाठी प्राचीन कला केंद्र चंदिगढ व भारत गायन पुणे यांच्या संग्लनतेने स्वर संगीत विदयालयाची स्थापना इ.स.१९९८ साली करण्यात आली यामध्ये बालकांना गायन, हार्मोनियम वादन, तबला वादन, वासुरी वादन कथ्थक डॉन्स प्रशिक्षण यासारखे गोष्टी देण्यात येवू लागले त्यामुळे मुलांमध्ये कला निर्माण करून या कलेच्या आधारे त्यांचे नावलौकिक करावे. त्याच्या अंगी असलेल्या प्रतिभेच्या माध्यमातून कलेचा वापर करून हि मुले भविष्यात आपल्या स्वतःच्या पायावर कश्या प्रकारे उभी राहतील व भारतीय संस्कृती जोपसतील याचा विचार करून संगीत विदयालय सुरु आहे.
१) क्रिडात्मक :-
स्वामी विवेकानंद व्यायाम शाळा अमर संस्थेने सन २००२ मध्ये क्रिडा संचालनालयाकडून मान्यता घेऊन व्यायाम शाळा सुरु करण्यात आली यात ४ स्टेज मशिन,८ स्टेज मशीन ,वेट लिप्टींग सह सर्व आधुनिक साधने उपलब्ध करण्यात आलेली आहेत ही व्यायामशाळा सर्व जातीधर्माच्या लोकांनसाठी खुली असुन येथे रोज १२० ते २५ स्त्रि पुरुष लाभ घेत आहेत व आपले जिवन निरोगी बनवत आहेत. व्यायाम शाळेमार्फत दरवर्षी शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित केली जाते.