अमर संस्थेच्या संकेत स्थळावर प्रथम आपले मनःपुर्वक स्वागत आपण आता पर्यंत अनेक सामाजीक संस्थांशी परिचीत असाल अश्याच प्रकारची आपल्या स्मरणात राहणारी एक संस्था अमर संस्था असेल अशी खात्री देतो.
अमर संस्थेच्या संकेत स्थळावर प्रथम आपले मनःपुर्वक स्वागत आपण आता पर्यंत अनेक सामाजीक संस्थाशी परिचीत असाल अश्याच प्रकारची आपल्या स्मरणात राहणारी एक संस्था अमर संस्था असेल अशी खात्री देतो. प्रत्येक क्षणी, प्रत्येक गोष्टीत कोणत्याही कामात फक्त नफा व तोटयाचा विचार करणाऱ्या आजच्या आधुनिक युगात सर्वत्र नीती, प्रामाणीकपणा, माणुसकी, सेवाभाव अश्या मुल्यांचा बोजवारा उडतांना दिसतोय. हयामुळे सध्या सर्वदूर निराशेचा अंधार बोकाळलाय. मात्र प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात या न्यायाने आजच्या हया निराशेच्या अंधकारातही सामाजिक, शैक्षणीक, सांकृतिक व क्रिडा क्षेत्रामधे " सेवा है यज्ञकुंड समिधासम हम " समर्पणच्या भावनेतुन समाजातील तळागाळातील जनतेपासुन ते उच्चभ्रू पर्यंत सर्वांसाठी काहीतरी करण्याच्या उद्शाने अमर संस्थेची जानेवारी १९८३ साली करण्यात आली. महाराष्ट्रातील जळगांव जिल्हातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चोपडा या आदीवासी बहुल्य तालुक्याच्या ठिकाणी जुने दत्त मंदिराच्या कटयावर बसणाऱ्या युवकांनी समाजातील गरजा ओळखून अमर संस्थेची स्थापना केली. कॉलेज जीवनाचा आनंद न घेता समाजसेवेचे व्रत अमर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घेतले. आपल्यातीलच एका अनाथ मित्रांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये यासाठी मदतीचा हात पुढे केला व यातुनच अनाथ विदयार्थी दत्तक योजनेला प्रारंभ झाला व समाजकार्याची सुरुवात झाली. सर्व सामान्य घरातील कार्यकर्त्यांनी समाजासाठी एक नवे उदाहरण दिले. याच बरोबर मुलांना वाचाल तर वाचाल या उक्तीचा प्रत्यय आणुन देण्याच्या दृष्टीने ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. मातृहृदयी सानेगुरुजीनी म्हटले आहे कि "बाहय क्रियेला महत्व नाही तुमच्या अंतःकरणातील वृत्तीला महत्व आहे" तेव्हा या चिंरतन सत्याला केंद्रस्थानी ठेवत २६ जानेवारी १९८३ रोजी अमर संस्थेची सुरुवात करून ग्रामिण पातळीवरील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणीक गरजांचे भान ठेऊन गत २९ वर्षापासुन चोपडयातील आमच्या अमर संस्थेने सामाजिक बांधलकी शब्दशः जोपासत विधायक कार्यात स्वतःला झोकून दिलय. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हे सानेगुरुजीचे विचार कृतीद्वारे स्पर्श ठरविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहोत. संस्थेने शासनाच्या अनुदानाचा, किंवा नफा -तोटा या व्यापारी तत्वाचा यत्किंचतही विचार न करता या विचारांवर निष्ठा ठेवत आपल्या कार्याचा जागर सुरु ठेवलाय.
आजच्या समाज रचनेत अनाथ, निराधार बालक व आयुष्याच्या संध्याकाळी मरणाच्या रात्रीची वाट पाहत बसलेली वृध्द मंडळी या दोघांची अवस्था सारखीच आई वडीलान विना असलेली पोरकी बालके व मुलं नातंवडान करीता पोरकी झालेली वृद्ध मंडळी यांच्या दोहोंच्या आयुष्यातील अंधार नष्ट करून प्रकाश फुलविणाच्या आशाकिरणाचे नांव आहे अमर संस्था.
संस्थेने अनाथ विदयार्थी दत्तक योजना, सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय, बालसंस्कार केंद्र, वत्र पेढी, श्री दत्त कॉम्प्युटर इस्टिटयुट, पू.सानेगुरुजी विदयालय वडती, आदर्श बालकाश्रम, बालमोहन विदयालय चोपडा, लिटलहार्ट इंग्लिश मेडीयम स्कूल, स्वर संगीत विदयालय, स्वामी विवेकानंद व्यायाम शाळा, प्रगती महिला मंडळ, बालकाश्रम (बालगृह), वृद्धाश्रम, गो-शाळा, व्यसनमुक्ती केंद्र, क्रिडा मंडळ, नेहरू युवा मंडळ, तंबाखु निर्मुलन अभियान, जल संधारण, चाईल्ड हेल्प लाईन इ. संस्थेकडून व संस्थेच्या पदाधिका यांन कडून समाजॠण फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न !